Uddhav Thackeray | मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्ट सुरू केला आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
या पॉडकास्टमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दरबारी गेले होते.
त्यांचं हे कोणत्या प्रकारचं राजकारण आहे? इर्शाळवाडीत अद्याप शोधकार्य सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दरबारी मुजरा करायला गेले होते. तिकडे जाऊन ते कुणाला आणि कशासाठी मुजरा करताय?”
Shivsena name is very important for us – Uddhav Thackeray
पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “शिवसेना हे नाव आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझ्या आजोबांनी शिवसेना हे नाव दिलेलं आहे.
निवडणूक आयोगाचं काम फक्त निवडणूक निशाणी आणि चिन्ह देण्याचं आहे, हे मी वारंवार सांगत आहे. मात्र, ते पक्षाला नाव देण्याचं काम आणि पक्षाचं नाव बदलण्याचं काम करत आहे.
त्यामुळं निवडणूक आयोगाविरुद्ध आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. शिवसेना हे नाव आम्हालाच पुन्हा मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.”
“भाजप नेते म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणे किंवा राष्ट्रवादीसोबत युती करणे ही आमची कूटनीती आहे, अधर्म नाही. परंतु ही त्यांची कूटनीती आहे की मेतकूट नीती आहे मला माहित नाही.
त्यांच्या या कूटनीतीला आता कुटून टाकायची वेळ आली आहे. सत्ताधाऱ्यांसाठी मला सत्ताभक्षक सध्या हा शब्द योग्य वाटत आहे”, असही ते (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “जसे नरभक्षक असतात तसे हे सत्ताभक्षक…”; उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर हल्लाबोल
- Balasaheb Thorat | “पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशी शेरेबाजी शोभत…”; बाळासाहेब थोरातांची PM मोदींवर टीका
- Chitra Wagh | “ईस्ट इंडिया कंपनी आणि विरोधकांची INDIA…”; विरोधकांच्या आघाडीवर चित्र वाघांची टीका
- Nitesh Rane | उद्यापासून प्रसारित होणारी उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे हास्यजत्रेचा महाएपिसोड – नितेश राणे
- Yashomati Thakur | सत्ताधाऱ्यांमुळे लोकांचे हाल होतायं – यशोमती ठाकूर