Yashomati Thakur | मुंबई: सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) सर्व आमदारांना निधी वाटप केला आहे.
निधी वाटप झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. ज्या ठिकाणी निधी नाही, त्या ठिकाणी लोकांचे हाल होत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलत असताना यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या, “गेल्या पाच वर्षापासून जी राजकीय परिस्थिती आहे, ती याआधी आम्ही कधीच पाहिली नव्हती.
पहिले महाविकास आघाडीचं सरकार होतं, तर आता महायुती सरकार आहे. आधी आमच्यासोबत बसणारे लोक आता तिकडे जाऊन बसले आहे.
राष्ट्रवादीच्या आमच्या सोबत बसणाऱ्या आमदारांना देखील चांगला निधी मिळाला आहे. मात्र, आमच्यातील एक दोन जणांनाच निधी देण्यात आला आहे.
Equal allocation of funds is very important for the development- Yashomati Thakur
पुढे बोलताना त्या (Yashomati Thakur) म्हणाल्या, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत जे आमदार आहे, त्यांना देखील पुरेसा निधी दिलेला नाही. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी समान निधी वाटप होणं खूप महत्त्वाचं आहे.
ज्या ठिकाणी सरकार निधी देत नाही, त्या ठिकाणी लोकांचे खूप हाल होत आहे आणि हे फक्त सत्ताधाऱ्यांमुळेच होत आहे. म्हणून लोक सरकारला कधीच माफ करणार नाही.”
“कर्नाटकमध्ये देखील अशा प्रकारच्या गोष्टी घडत होत्या. परंतु कर्नाटकच्या जनतेनं सरकारला चांगलचं उत्तर दिलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची जनता ही सत्ताधाऱ्यांना चांगलचं उत्तर देईल”, असही त्या (Yashomati Thakur) यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणार? शिवसेनेच्या 40 आमदारांनी मागितली मुदतवाढ
- Monsoon Session | “इथं आम्ही गोट्या खेळायला आलो…”; सभागृहात उशिरा येणाऱ्या नेत्यांवर भाजपचे सुरेश धस संतापले
- Eknath Shinde | आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणार? शिवसेनेच्या 40 आमदारांनी मागितली मुदतवाढ
- Sanjay Raut | उद्धव ठाकरे जेव्हा बोलू लागतात तेव्हा शिंदे-फडणवीस यांच्या पोटात गोळा येतो – संजय राऊत
- Chitra Wagh | उंदराला मांजर साक्ष; चित्रा वाघांची ठाकरे गटावर बोचरी टीका