Share

Monsoon Session | “इथं आम्ही गोट्या खेळायला आलो…”; सभागृहात उशिरा येणाऱ्या नेत्यांवर भाजपचे सुरेश धस संतापले

Monsoon Session | मुंबई: सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. आज सकाळीच पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं आहे.

कामकाज सुरू झालं असलं तरी सभागृहात अधिकारी आणि संबंधित खात्याचे मंत्री वेळेवर उपस्थित नव्हते. या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

When we don’t have a car, we take a taxi – Suresh Dhas

सभागृहात आमदार वेळेवर उपस्थित नसल्यामुळं सुरेश धस संतापले. ते म्हणाले, “आमच्याकडे जेव्हा गाडी नसते, तेव्हा आम्ही टॅक्सी करून येतो.

त्याचबरोबर आम्ही तीन तीन जिल्ह्यातून निवडून येतो. इथं वेळेत येऊन बसायला आम्ही काही पागल नाही. जे मंत्री आणि अधिकारी उशिरा येत आहे, त्यांना वेळेत समज दिलीच पाहिजे. हे सर्वोच्च सभागृह आहे. इथे आम्ही गोट्या खेळायला येतो काय?”

पुढे बोलताना ते म्हणाले, “इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत आहे. मात्र, संबंधित मंत्री इथे उपस्थित नाही.

कृषी विभागाचा संबंधित अधिकारी कोण आहे? दरवेळी काही ना काही कारणं दिली जातात. म्हणून काल आपण वेळ वाढवून घेतली आहे.”

दरम्यान, सुरेश धस यांनी उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांना समज देण्याची मागणी तालिका सभापतींकडे केली. उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांना समज देऊ, असं आश्वासन तालिका सभापतींनी त्यांना दिलं. त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात हजर राहून सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

महत्वाच्या बातम्या

Monsoon Session | मुंबई: सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. आज सकाळीच पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics