Aditya Thackeray | इतरांना देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटणारे आता कुठे आहेत? – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार घडत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे.

मणिपूर प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं सुनावलं आहे. मणिपूर प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.

मणिपूर प्रकरणावरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मणिपूरची अवस्था पाहून सरकारनं शांत बसणं ही देशासाठी अत्यंत शरमेची गोष्ट असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले, ” मणिपूर- स्वातंत्र्यसैनिकाच्या ८० वर्षीय पत्नीला जिवंत जाळण्यात आले. कारगिल युद्धात आपल्या देशासाठी लढलेल्या सैनिकाच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि कपड्यांशिवाय धिंड काढण्यात आली.”

There is a need to bring President’s rule in Manipur – Aditya Thackeray

“इतरांना देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटणारे आता कुठे आहेत? स्वातंत्र्यसैनिक किंवा सैनिकांचे टॅग नसला तरीही महिलांवर असे अत्याचार होणं आणि सरकारने गप्प बसणं ही देशासाठी शरमेची गोष्ट आणि भीषण शोकांतिका आहे!

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची ताबडतोब हकालपट्टी करून तिथे राष्ट्रपती राजवट आणण्याची गरज आहे”, असही त्यांनी या (Aditya Thackeray) ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, केल्या काही दिवसांपूर्वी मणिपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला (Aditya Thackeray) होता.

मणिपूरमध्ये दोन महिलांची एका जमावाने नग्न दिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार या व्हिडिओमध्ये दिसला होता. या व्हिडिओवर राज्यासह देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.