Uddhav Thackeray | मुंबई: 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात जोरदार बॅनरबाजी होताना दिसली आहे.
या बॅनर्सवर अजित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ आणि ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये बॅनरबाजी होताना दिसत आहे.
Uddhav Thackeray’s birthday is on July 27
27 जुलै रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस आहे. रायगड जिल्ह्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरेंनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर बॅनर्स लावले आहे. या बॅनर्सवर उद्धव ठाकरेंचा भावी पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आलेला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी विरोधकांच्या आत्तापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहे. तर तिसरी बैठक लवकरच मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.
सत्ताधाऱ्यांच्या ‘एनडीए’ वर मात करण्यासाठी विरोधकांनी ‘इंडिया’ नावाची आघाडी उभी केली आहे. परंतु विरोधी पक्षाच्या पंतप्रधान पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही.
अशात उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) भावी पंतप्रधान म्हणून बॅनर लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Prakash Ambedkar | अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही हे फक्त तीन नेते सांगू शकतात – प्रकाश आंबेडकर
- Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवारांची टीका, म्हणाले…
- Ambadas Danve | “सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, नाहीतर…”; निधी वाटपावर अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका
- Ajit Pawar | विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही; निधी वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Monsoon Session | खोक्यांवर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला; सरकार विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन