Ajit Pawar | विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही; निधी वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | मुंबई: सध्या निधी वाटपावरून राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहे.

अजित पवारांनी निधी वाटप करताना भेदभाव केला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

All the MLAs have been allocated equal funds – Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अर्थ खात मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी 25 कोटी पेक्षा अधिक निधी मंजूर केला आहे. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “निधीवाटप झाल्यानंतर विरोधक आरोप करत आहे. मात्र, त्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. निधी वाटप करताना कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही. सर्व आमदारांना समान निधी वाटप करण्यात आला  आहे.”

दरम्यान, यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी निधी वाटपावरून अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली होती. त्या म्हणाल्या, “अजित पवारांनी त्यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी दिला आहे.

त्याचबरोबर त्यांनी शिंदे गटातील आमदारांना देखील चांगला निधी उपलब्ध करून दिला. मात्र, त्यांनी विरोधी पक्षांच्या आमदारांना पुरेसा निधी दिला नाही.”

“अजित पवारांनी (Ajit Pawar) आम्हाला काहीच निधी दिला नाही. त्यांनी फक्त काँग्रेसच्या काही निवडक आमदारांनाच निधी दिला आहे. आम्हाला निधी न देण्याचे कारण काय?”, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

निधी वाटप करत असताना अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदार नाराज होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत निधी वाटप केल्याचं दिसून आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.