Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवारांची टीका, म्हणाले…
Ajit Pawar | मुंबई: आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारविरुद्ध विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे.
दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. रोहित पवारांच्या या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीनं बसणं उचित नाही, असं अजित पवार म्हणाले आहे.
It is not appropriate for people’s representatives to sit in such a manner – Ajit Pawar
रोहित पवारांच्या आंदोलनावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “अजून अधिवेशन संपलेलं नाही. अधिवेशन सुरू होऊन आत्ताशी एक आठवडा झाला आहे.
आंदोलन मागे घेण्यासाठी स्वतः मंत्रिमहोदय पत्र देतात. त्यामुळे निवेदन केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्याची गंभीरतेनं नोंद घ्यायला हवी. लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने बसणं उचित नाही.”
दरम्यान (Ajit Pawar), कर्जत-जामखेडच्या तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, असं म्हणत रोहित पवारांनी विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलं.
त्यांच्या या आंदोलनामुळं सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं आहे.
मात्र, त्या जागेचा पवित्र राखलं पाहिजे, असं मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी व्यक्त केलं आहे.
रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन किंवा उपोषण करू नये. त्यांचं जे काही मत आहे, त्यांनी ते सभागृहात येऊन मांडायला हवं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करणे योग्य नाही”, असेही राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve | “सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, नाहीतर…”; निधी वाटपावर अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका
- Ajit Pawar | विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही; निधी वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Rohit Pawar | दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार – रोहित पवार
- Aditya Thackeray | उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही – आदित्य ठाकरे
- Sanjay Raut | संजय राऊतांनी ठरवलं असतं तर अजितदादा 2019 ला मुख्यमंत्री झाले असते – अनिल पाटील