Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.
त्यानंतर अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही हे फक्त तीन लोक सांगू शकतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.
अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार की नाही यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील का नाही हे फक्त तीनच लोक सांगू शकतात.
एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi), दुसरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि तिसरे म्हणजे स्वतः अजित पवार. या तीन लोकांकडं या प्रश्नाचं उत्तर आहे. चौथा कुणीही यावर उत्तर देऊ शकत नाही.”
दरम्यान, या प्रकरणावर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले, “आम्ही जेव्हा राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार केला होता, तेव्हाच मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टता होती.
तशी आमची आधीच चर्चा झाली होती. आता अजित पवार गट एनडीएचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा विषयाची येत नाही.”
Ajit Pawar will soon become the Chief Minister of Maharashtra – Sanjay Raut
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला अनिल पाटलांनी (Anil Patil) उत्तर दिलं होतं.
अनिल पाटील म्हणाले, “संजय राऊत यांनी ठरवलं असतं तर अजित पवार 2019 मध्येच मुख्यमंत्री झाले असते. जेव्हा त्यांच्या हातात होतं तेव्हाच त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं असतं तर बरं झालं असतं.”
महत्वाच्या बातम्या
- Anil Parab | “वाढदिवस झाला, आता रिटर्न गिफ्ट म्हणून आम्हाला…”; अनिल पराबांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मागणी
- Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवारांची टीका, म्हणाले…
- Ambadas Danve | “सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, नाहीतर…”; निधी वाटपावर अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका
- Ajit Pawar | विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही; निधी वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Monsoon Session | खोक्यांवर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला; सरकार विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन