Anil Parab | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या निधी वाटपानंतर राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर निधी वाटपावरून विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे एक अजब मागणी केली आहे.
Both should give us suitable funds as return gift – Anil Parab
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 22 जुलै रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त दोघांनाही शुभेच्छा मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
अनिल परब म्हणाले, “नुकताच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस झाला. मात्र रायगडमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे दोघांनीही वाढदिवस साजरा केला नाही.
परंतु, तरीही संपूर्ण सभागृहाच्या वतीनं मी दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आता दोघांनीही आम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून योग्य तो निधी द्यावा.”
दरम्यान, अनिल परब यांच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अनिल परब यांच्या या मागणीवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय प्रतिक्रिया देतील? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे अजित पवारांनी निधी वाटपामध्ये भेदभाव केला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी योग्य निधी वाटप केला असल्याचं मत शिंदे गटानं व्यक्त केलं आहे.
निधी वाटपावरून अजित पवारांवर विरोधक टीका करत आहे. विरोधकांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “निधी वाटप झाल्यानंतर विरोधक माझ्यावर आरोप करत आहे.
मात्र, त्यांच्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. निधी वाटप करताना कुणावरही अन्याय झालेला नाही. सर्वांना समान निधी वाटप करण्यात आला आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवारांची टीका, म्हणाले…
- Ambadas Danve | “सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, नाहीतर…”; निधी वाटपावर अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका
- Ajit Pawar | विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही; निधी वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Monsoon Session | खोक्यांवर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला; सरकार विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
- Rohit Pawar | दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार – रोहित पवार