Jayant Patil | ही दोस्ती तुटायची नाय; जयंत पाटील आणि सुनील तटकरेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Jayant Patil | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यांच्या या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे.

यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट एकमेकांवर टीका करताना दिसले आहे. अशात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांची राजकारणापलीकडची मैत्री आज विधानभवनात बघायला मिळाली आहे.

Jayant Patil and Sunil Tatkare have met

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधानभवनात सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि जयंत पाटील (Jayant Patil) दोघेही उपस्थित होते.

अधिवेशनात या दोन्ही मंत्र्यांनी गळाभेट घेतली. त्यांच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर जयंत पाटील (Jayant Patil) शरद पवारांसोबत, तर सुनील तटकरे अजित पवारांसोबत आहे.

अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं. त्यानंतर एकाच पक्षात जयंत पाटील आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष झाले.

अजित पवार यांच्यासह गेलेल्या आमदारांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांना धारेवर धरलं होतं. बडव्यांनी आमच्या विठ्ठलाला म्हणजेच शरद पवारांना घेरलं असल्याचा आरोप अजित पवार गटातील नेत्यांनी केला होता.

या वक्तव्यातून अजित पवार गटानं जयंत पाटलांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गटातील आमदारांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चांगली चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.