Shambhuraj Desai | पृथ्वीराज चव्हाणांना संजय राऊतांचा गुण लागलायं – शंभुराज देसाई

Shambhuraj Desai | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने अजित पवार मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य करत आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

अजित पवार 10 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री होणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Prithviraj Chavan met Sanjay Raut – Shambhuraj Desai

पृथ्वीराज चव्हाण यांना उत्तर देत शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांनी संजय राऊत यांची भेट घेतली, असं दिसत आहे.

कारण पृथ्वीराज चव्हाण यांना संजय राऊत यांचा वाण नाही तर गुण लागला आहे. सरकार जाणार, असं संजय राऊत सकाळ, दुपार, संध्याकाळ बोलत असतात. त्यांच्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण देखील असंच काही बोलत आहे.”

पुढे बोलताना ते (Shambhuraj Desai) म्हणाले, “काँग्रेसच्या आमदारांना निधी दिल्यामुळे ते एकमेकांकडे संशयाने बघत आहे. त्यांना आमच्या घरात वाकून पाहण्याची काहीच गरज नाही.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सर्व गोष्टी बघूनच आमदारांच्या पात्रतेचा निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी संजय राऊत यांच्या संगतीत राहून भविष्यवाणी वर्तवण्याचं काम करू नये.”

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठ वक्तव्य केलं (Shambhuraj Desai) होतं. ते म्हणाले, “आमच्या राजकीय अकललानुसार 10 ऑगस्ट किंवा एक-दोन दिवसांमध्ये अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात.

कारण एकनाथ शिंदे भाजपचे नेतृत्व योग्य पद्धतीने करू शकत नाही. त्यामुळे शिंदेंना दुसरी सन्मान जनक जबाबदारी देऊन अजित पवारांना मुख्यमंत्री पद द्यावं, असा त्यांचा निर्णय झालेला दिसतोयं.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.