Share

Uddhav Thackeray | “जसे नरभक्षक असतात तसे हे सत्ताभक्षक…”; उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई: उद्या (27 जुलै) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. दोन भागांमध्ये ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. या मुलाखतीतील पहिला भाग आज प्रसारित झाला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल … Read more

Published On: 

Uddhav Thackeray | मुंबई: उद्या (27 जुलै) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.

दोन भागांमध्ये ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. या मुलाखतीतील पहिला भाग आज प्रसारित झाला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जसे नरभक्षक असतात तसे हे सत्ताभक्षक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

What was the need to break the NCP when there were enough MLAs in the government? – Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणणाऱ्या नेत्यांनी आता काय केलं आहे? तुम्ही राष्ट्रवादी ही फोडली?

सरकारमध्ये पुरेसे आमदार असताना राष्ट्रवादी फोडण्याची काय गरज होती? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या चार-पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

मात्र, नंतर त्या आरोपांचं काय झालं? सत्ताधारी कशासाठी ही फोडाफोडी करत आहे?

पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणे किंवा राष्ट्रवादीसोबत युती करणे ही आमची कुटनीती  आहे. तो अधर्म नाही, असं भाजप नेते सांगतात.

मात्र, ही कुटनीती आहे की मेतकूट नीती मला माहित नाही. परंतु त्यांच्या या कूटनीतीला आता कुटून टाकायचं आहे. यांच्यासाठी मला सत्ताभक्षक हाच योग्य शब्द वाटत आहे. ज्याप्रकारे नरभक्षक असतात त्याचप्रमाणे हे सत्ताभक्षक आहे.”

“सत्तेपुढे यांना सध्या काहीच दिसत नाहीये. सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तालोलूपता आली आहे. खुर्ची आणि सत्ता पुढे यांना माणसही दिसत नाही.

त्याचबरोबर महिलांवर होणारे अत्याचार, वाढती महागाई हे महत्त्वाचे विषय देखील त्यांना दिसत नाही”, असही ते (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही