Jayant Patil | सुनील तटकरेंसोबत झालेल्या भेटीत काय झालं? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Jayant Patil | मुंबई: काल (24 जुलै) विधिमंडळ अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधान भवन परिसरात राजकारणापलीकडची मैत्री बघायला मिळाली.

अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाचे जयंत पाटील यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.

It has become very difficult to talk to someone as a human being – Jayant Patil 

जयंत पाटील म्हणाले, “सुनील तटकरे आणि माझ्या भेटीचा काहीही राजकीय संबंध नव्हता. माणूस म्हणून कुणासोबत बोलणं अत्यंत कठीण झालं आहे.

आम्ही एकमेकांच्या डोक्यात काठ्या घालणं अपेक्षित आहे का? सुनील तटकरे आणि मी भेटल्यानंतर काही खाजगी चर्चा केली. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. सुनील तटकरे यांनी ठरवलं म्हणून अजित पवारांसोबत गेले. त्याचबरोबर आम्ही पवार साहेबांसोबत आहोत.”

यावेळी बोलत असताना जयंत पाटील यांनी माणिपूरमध्ये घडत असलेल्या हिंसाचारावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “महिला बेपत्ता प्रकरणाचा मुद्दा आम्हीच उपस्थित केला आहे.

या प्रकरणामध्ये फक्त एफआयआर दाखल केले जात आहे. मात्र, आरोपींना अटक केली जात नाही. भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस उध्वस्त होताना दिसत आहे. माणिपूरमध्ये होणाऱ्या हिंसाचारावरून हे चांगलंच दिसून आलं आहे.

“मणिपूरमध्ये भाजपचं सरकार आहे. त्याचबरोबर देशामध्ये सुद्धा भाजप सरकार आहे. मणिपूरमध्ये लोकांना सुरक्षित वाटत नाही. त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होताना दिसत आहे.

मणिपूरमधील हिंसा थांबवण्यासाठी सरकारनं  त्या ठिकाणी आर्मी पाठवायला हवी. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत”, असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.