Chitra Wagh | “ईस्ट इंडिया कंपनी आणि विरोधकांची INDIA…”; विरोधकांच्या आघाडीवर चित्र वाघांची टीका

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या बैठका होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर विरोधकांची नुकतीच बंगळुरू शहरामध्ये बैठक पार पडली. यामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या एनडीए (NDA) ला टक्कर देण्यासाठी इंडिया (INDIA) नावाची आघाडी उघडली आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

विरोधकांच्या इंडिया आघाडीवर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची तुलना ईस्ट इंडिया कंपनीसोबत केली आहे.

ईस्ट इंडिया कंपनीचा जो हेतू होता, तोच हेतू विरोधकांच्या आघाडीचा आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “ईस्ट इंडिया कंपनी आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी. दोन्ही नावं वेगवेगळी जरी असली तरी दोघांचा हेतू एकच आहे.

आधी ईस्ट इंडिया कंपनी होती आता विरोधकांची इंडिया आहे. ‘भारताची लूट करणे’ हे या दोघांचेही स्पष्ट धोरण आहे.”

26 political parties have joined the INDIA Alliance of Opposition

दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये तब्बल 26 राजकीय पक्ष सामील झाले आहे. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम इत्यादींचा समावेश (Chitra Wagh) आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.