Share

Gulabrao Patil | “खेकड्यांना चांगलं सांभाळलं असतं तर धरण…”; गुलाबराव पाटलांचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

Gulabrao Patil | मुंबई: 27 जुलै रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका करताना दिसले आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव … Read more

Published On: 

Gulabrao Patil | मुंबई: 27 जुलै रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका करताना दिसले आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना खेकड्यांची उपमा दिली आहे.

A crab is a very versatile animal – Gulabrao Patil

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, “खेकडा हा एक अत्यंत गुणकारी प्राणी आहे.

कावीळ झालेल्या लोकांसाठी खेकडा एक रामबाण उपाय ठरू शकतो. खेकड्याला जर आधीच तुम्ही नीट सांभाळलं असतं तर कदाचित तुमचं धरण फुटलं नसतं.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्यांच्या या टिकेला उत्तर देत गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबासह नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते.

उद्धव ठाकरे त्याला मुजरा करणं म्हणत असतील तर ती अत्यंत चुकीची बाब आहे. या आधी तुम्ही देखील पंतप्रधानांना भेटायला जात होतात. पण तुमच्या भेटीला आम्ही कधी मुजरा म्हटलं नाही. उद्धव ठाकरे पंतप्रधानांना रामराम करायला जात होते, असं मला वाटतं.”

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी सकाळी 08 वाजता प्रसारित होणार आहे.

“माझ्या नेतृत्वाखाली सरकार वाहून गेलं नाही. तर खेकड्यांनी हे धरण फोडलं”, असं उद्धव ठाकरे या मुलाखतीदरम्यान म्हणाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात पुन्हा एकदा नाव वाद निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही