Sanjay Gaikwad | मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रसारित होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खेकड्याची उपमा दिली असल्याचं दिसलं आहे. ठाकरेंच्या या टीकेला संजय गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे.
Uddhav Thackeray himself is ineffective – Sanjay Gaikwad
संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, “उद्धव ठाकरे स्वतः अकार्यक्षम आहे. त्याबद्दल ते कधीच बोलू शकत नाही. अडीच वर्ष ते सत्तेत होते.
मात्र, अडीच वर्षांमध्ये अडीच तासही ते मंत्रालयात कधी आले नाही. त्याचबरोबर ते कधी घराबाहेर देखील निघाले नाही. कोरोना महामारीच्या काळामध्ये ते चार भिंतीच्या आतच राहिले आहे. मी घरी बसून सरकार चालवलं, असं ते आता सांगतात.”
पुढे बोलताना ते (Sanjay Gaikwad) म्हणाले, “पण घरी बसून व्यवसाय किंवा शेती करता येते का? तुम्हा पत्रकारांना देखील घराबाहेर पडूनच काम करावं लागतं.
कारण घरी बसून पत्रकारिता होत नाही. स्वतःची पात्रता नसताना उद्धव ठाकरे राज्य कारभार सांभाळायला बसले होते. त्यांनी कामं केली नाही, म्हणून आमदार नाराज झाले होते.
दरम्यान, संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्या नेतृत्वाखाली माझं सरकार वाहून गेलं नाही. तर खेकड्यांनी हे धरण फोडलं आहे.”
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गट (Sanjay Gaikwad) आणि ठाकरे गटात पुन्हा मोठा वाद सुरू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Balasaheb Thorat | “पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशी शेरेबाजी शोभत…”; बाळासाहेब थोरातांची PM मोदींवर टीका
- Gulabrao Patil | “खेकड्यांना चांगलं सांभाळलं असतं तर धरण…”; गुलाबराव पाटलांचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर
- Jayant Patil | सुनील तटकरेंसोबत झालेल्या भेटीत काय झालं? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
- Nitesh Rane | उद्यापासून प्रसारित होणारी उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे हास्यजत्रेचा महाएपिसोड – नितेश राणे
- Dhananjay Munde | फक्त टीका करायला विरोधक उपस्थित राहतात; विरोधकांच्या गैरहजरीवर धनंजय मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया