प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही क्लिप भाजपच्याच एका विधान परिषद आमदाराने बाहेर आणल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला असून, ‘क्लिप बाहेर आणणाऱ्याचा हेतू काय? आणि एवढं लाडात कोण आलं होतं?’ असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.
या क्लिपवर बोलताना राऊत म्हणाले की, यामध्ये मनोज जरांगे हे मुख्य पात्र असून त्यांच्याभोवती हे संपूर्ण प्रकरण फिरत आहे. याशिवाय फडणवीस आणि शिंदे हे दुसरे व तिसरे पात्र आहेत. उर्वरित सर्व जण ‘फडणवीस थिएटर ग्रुप’चे एक्स्ट्रा कलाकार असून, यात ‘शिंदे थिएटर ग्रुप’चा कुणीही नाही. म्हणजेच ५०० कोटींची ही चर्चा पूर्णपणे भाजपच्या अंतर्गत असल्याचा दावा राऊत यांनी केला. या क्लिपमध्ये शिंदेंच्या चिरंजीवांना ५०० कोटी रुपये दिल्याचे म्हटले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
जरांगे यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली असली तरी, मूळ टेप कोणी फोडली हा खरा प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले. या प्रक्रियेत सहभागी असलेल्या आणि जरांगेंशी चर्चा करणाऱ्या भाजपच्याच एका विधान परिषद आमदाराने ही टेप फोडली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याचे खूप लाड केले आणि तेच आता त्यांच्या अंगलट आले आहे. यातून भाजपमधील अंतर्गत स्पर्धा उघड झाल्याचा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री प्रत्यक्ष ५०० कोटी उचलले की नाही यावर बोलणार नाहीत आणि त्याची चौकशीही करणार नाहीत, असा दावाही राऊत यांनी केला.
केंद्रातील सरकार पडणार, याची खात्री झाल्याने भाजप नेत्यांना आता महाराष्ट्राची चिंता सतावत आहे. त्यामुळे आपण कोणत्या गटात आहोत, हे दाखवण्याची त्यांच्यात स्पर्धा लागली आहे. मुंढवा जमीन प्रकरणात सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना समन्स पाठवले जाते, मग ५०० कोटींच्या या व्यवहारात गुन्हा का दाखल होत नाही? असा सवाल राऊत यांनी केला. आधी गुन्हा दाखल करा आणि मग ‘एसआयटी’ स्थापन करा, फॉरेन्सिक चौकशीच्या गोष्टी या निव्वळ दंतकथा असून सर्व खोटे असल्याचे ते म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी साथ दिली नसती तर शिंदेंचा जीव धोक्यात आला असता; रामदास कदमांच्या आरोपांवर नितेश राणेंचा पलटवार
- रामदास कदम आक्रमक नेते, प्रसाद लाडांनी त्यांच्या वयाचा आदर राखावा; ऑडिओ क्लिप वादावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
- भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या हे खपवून घेणार नाही; रामदास कदमांच्या टीकेवर दरेकरांचा पलटवार
Quick Answers
संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, या प्रक्रियेत सहभागी असलेल्या आणि मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणाऱ्या भाजपच्याच एका विधान परिषद आमदाराने ही टेप फोडली आहे.
संजय राऊत यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे, या क्लिपमध्ये शिंदेंच्या चिरंजीवांना ५०० कोटी रुपये दिल्याचे म्हटले आहे.
मुंढवा जमीन प्रकरणात सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना समन्स पाठवले जाते, मग ५०० कोटींच्या या व्यवहारात गुन्हा का दाखल होत नाही, असा सवाल राऊत यांनी केला.
संजय राऊत यांच्या मते, आधी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि त्यानंतर 'एसआयटी' स्थापन करावी; फॉरेन्सिक चौकशीच्या गोष्टी निव्वळ दंतकथा आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







