Balasaheb Thorat | “पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशी शेरेबाजी शोभत…”; बाळासाहेब थोरातांची PM मोदींवर टीका

Balasaheb Thorat | मुंबई: देशातील सत्ताधारी पक्षाला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी स्थापन केली आहे. विरोधकांच्या या आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जोरदार टीका केली आहे.

इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी नावामध्ये देखील इंडिया नाव होतं. त्यामुळं फक्त इंडिया नाव ठेवून काही होत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

The opposition has formed an alliance called India to unite – Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, “पंतप्रधान हे खूप मोठे पद आहे. पंतप्रधान हे देशाचे प्रमुख असतात. त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकारची टीका करणे योग्य नाही.

विरोधकांनी एकत्र येण्यासाठी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. पंतप्रधानांनी अशी शेरेबाजी करणं योग्य नाही.”

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष (Balasaheb Thorat) एकत्र आले आहे. विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरोधात नवीन आघाडी स्थापन केली आहे.

विरोधकांनी त्यांच्या या आघाडीला इंडिया म्हणजेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स (Indian National Development Inclusive Alliance) असे नाव दिले आहे. विरोधकांच्या या आघाडीवर मोदींनी आज खोचक टीका केली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या ‘एनडीए’ला टक्कर देण्यासाठी इंडियामध्ये (Balasaheb Thorat) काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम सारखे तब्बल 26 राजकीय पक्ष सामील झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.