Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्ट मुलाखत दिली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे.
ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत… भन्नाट!
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत.”
The country is safe under the leadership of Narendra Modi and Amit Shah
पुढे ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे. उद्धव ठाकरे यांना तुम्हाला तुमच्या आमदारांचं नेतृत्व करता आलं नाही.
ते तुमच्या नाकर्तेपणामुळे नाकाखालून निघून गेले. मुख्यमंत्री असताना तुम्ही मातोश्री बाहेर पडले नाहीत आणि आता लोकांना दोष देत आहात. कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही.”
मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत… भन्नाट!
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 26, 2023
“कारण २०१९ साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हांच तुम्ही नितीमत्ता पायाखाली तुडवली होती. त्यामुळे घरात बसून निती-अनितीच्या गप्पा तुम्ही मारु नका.
घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे,” असही त्यांनी (Chandrashekhar Bawankule) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | शिवसैनिकानं उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त लिहिलं रक्तानं पत्र
- Ashish Shelar | उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे अपचनाचे करपट ढेकर – आशिष शेलार
- Uddhav Thackeray | “जसे नरभक्षक असतात तसे हे सत्ताभक्षक…”; उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर हल्लाबोल
- Uddhav Thackeray | “जसे नरभक्षक असतात तसे हे सत्ताभक्षक…”; उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर हल्लाबोल
- Sanjay Raut | दुसऱ्यांचे डबे लावूनच हे सरकार चालणार आहे का? संजय राऊतांची सरकारवर खोचक टीका