Sanjay Raut | मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मुलाखत प्रसारित झाली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. दुसऱ्यांचे डबे लावूनच हे सरकार चालणार आहे का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Does the government have its own energy, its own fuel or not? – Sanjay Raut
प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सध्या राज्यामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आहे, असं म्हणतात. पूर्वी राज्यामध्ये डबल इंजिन सरकार होतं.
त्याआधी सिंगल इंजिन सरकार होतं. तर आता ट्रिपल इंजिन सरकार आहे. अशा किती इंजिनावर अजून राज्य सरकार चालणार आहे? या सरकारला स्वतःची ऊर्जा, स्वतःचं इंधन आहे की नाही? नेहमी दुसऱ्यांचेच डबे लावून हे सरकार चालणार आहे?”
मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार घडत आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मणिपूर प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, “मणिपूरचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरेंनी मणिपूर विषयी चिंता व्यक्त केली आहे. ज्या मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य नाही, घटनेचं राज्य नाही, त्या ठिकाणी केंद्र सरकार कोणत्या तोंडानं समान नागरी कायदा लागू करणार आहे.”
“केंद्र सरकार प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा कायदा लागू करत आहे. राजकारणानुसार ते सोयीची भूमिका बजावतात. जे त्यांच्या पक्षात जातील त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे.
जे त्यांना विरोध करतात त्यांच्यासाठी वेगळा कायदा, हे काही समान नागरी कायद्याचं लक्षण नाही. आधी सर्वांना समान वागणूक द्या आणि मग समान नागरी कायद्याविषयी बोला”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Ashish Shelar | उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे अपचनाचे करपट ढेकर – आशिष शेलार
- Uddhav Thackeray | “इर्शाळवाडीत शोधकार्य सुरू असताना मुख्यमंत्री दिल्लीत मुजरा मारायला…”; उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंवर घणाघात
- Uddhav Thackeray | “जसे नरभक्षक असतात तसे हे सत्ताभक्षक…”; उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर हल्लाबोल
- Sanjay Gaikwad | “अडीच वर्षाचं सरकार असताना अडीच तासही…”; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर संजय गायकवाडांची संतप्त प्रतिक्रिया
- Balasaheb Thorat | “पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशी शेरेबाजी शोभत…”; बाळासाहेब थोरातांची PM मोदींवर टीका