Uddhav Thackeray | मुंबई: राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (19 जुलै) ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधान भवन परिसरात उपस्थित होते.
यावेळी दोघांनी भेट घेऊन काही चर्चा केली. त्यांच्या या चर्चेवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांना ‘आवाज कुणाच्या’ या पॉडकास्टच्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत असताना उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना मोलाचा सल्ला दिला आहे.
I have worked with Ajit Pawar for two and a half years – Uddhav Thackeray
अजित पवारांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “अजित पवारांसोबत मी अडीच वर्ष काम केलं आहे. त्या कालावधीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून राज्यकारभार सांभाळला होता.
तेव्हा देखील त्यांच्याकडे अर्थखात देण्यात आलं होतं. अजित पवार हे व्यवस्थित चौकटीत काम करणारे व्यक्ती आहे. राज्यकारभार आणि त्यांचं खात व्यवस्थित रित्या सांभाळतात.”
पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “अजित पवारांना मी एकच गोष्ट सांगितली की, तुम्ही सत्तेच्या साठमारीत राज्याला आणि जनतेला विसरू नका.
अजित पवार सत्तेत सामील होण्याच्या चार-पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत होते. आता मोदींनीच त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहे. मग मोदींनी केलेले आरोप खरे की खोटे?”
दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टसाठी एक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार त्याचबरोबर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | भाजपसोबत युती करणार का? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
- Chandrashekhar Bawankule | “मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत…”; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Uddhav Thackeray | शिवसैनिकानं उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त लिहिलं रक्तानं पत्र
- Ashish Shelar | उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे अपचनाचे करपट ढेकर – आशिष शेलार
- Sanjay Gaikwad | “अडीच वर्षाचं सरकार असताना अडीच तासही…”; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर संजय गायकवाडांची संतप्त प्रतिक्रिया