Raj Thackeray | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
At present we have only one opposition party in Maharashtra – Raj Thackeray
सध्या विरोधी पक्ष नेता नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “आधी विरोधी पक्ष कोणता आहे? ते मला सांगा आणि मगच प्रश्न विचारा. राज्यात सध्या विरोधी पक्ष दिसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये सध्या आमचा एकच विरोधी पक्ष दिसत आहे.”
अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीवर बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “अजित पवार यांचा शपथ झाल्यानंतर पहिल्या एक तासातच मी ट्विट केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली टीम रवाना झाली असल्याचं मी त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. आज सगळं त्याचप्रमाणे घडत आहे. आजही बाहेर बॅनर्स लागले आहे.
या बॅनर्समध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार हे एकत्र दिसले आहे. आजही दोघांचे एकत्र फोटो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी शरद पवार यांचं राजकारण बघत आहे. त्यावरून ही सगळी मिलीभगत असल्याचं मला वाटत आहे.”
भारतीय जनता पक्षासोबत युती करणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “कुणी कुणाची भेट घेतली म्हणजे युती होत नाही.
मी एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला गेलो होतो. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील उपस्थित होते. म्हणजे आमची लगेच युती झाली का? आम्ही भाजपसोबत जाणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | “सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत…”; चित्रा वाघांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले
- Uddhav Thackeray | सत्तेच्या साठमारीत राज्याला विसरू नका; उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोलाचा सल्ला
- Uddhav Thackeray | सत्तेच्या साठमारीत राज्याला विसरू नका; उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोलाचा सल्ला
- Chandrashekhar Bawankule | “मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत…”; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Uddhav Thackeray | शिवसैनिकानं उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त लिहिलं रक्तानं पत्र