Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टसाठी मुलाखत दिली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतील पहिला भाग आज प्रसारीत करण्यात आलेला आहे.
या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर टीका केली आहे. पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना सुनालं आहे.
Uddhavji you have a good artist hidden in you – Chitra Wagh
ट्विट करत चित्रा (Chitra Wagh) वाघ म्हणाल्या, “उद्धवजी तुमच्यात एक चांगला कलाकार दडलेला आहे, हे आम्ही जाणतो… पण त्याची झलक कुठं दिसली नाही राव. पक्ष चालवण्यात अपयशी ठरल्याची भावना तुमच्या चेह-यावर होती. आणि बघ कसा संपवला पक्ष म्हणत.”
पुढे त्या (Chitra Wagh) म्हणाल्या, “सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत होते. सारं केविलवाणं चित्र…दोघांनीही मुलाखतीत आणलेलं उसणं अवसान मात्र बेस्टच…!
पण काही प्रश्नांची उत्तरं घ्यायची राहिली बघा…. एखाद्या कणा असलेल्या पत्रकाराला मुलाखत दिली असती तर पोकळ बातांपेक्षा काही ठोस प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेलाही मिळाली असती.”
उद्धवजी @uddhavthackeray तुमच्यात एक चांगला कलाकार दडलेला आहे,
हे आम्ही जाणतो… पण त्याची झलक कुठं दिसली नाही राव.पक्ष चालवण्यात अपयशी ठरल्याची भावना तुमच्या चेह-यावर होती.
आणि बघ कसा संपवला पक्ष म्हणत… सर्वज्ञानी संजय राऊत @rautsanjay61 तुम्हाला वेडावत होते.
सारं…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 26, 2023
“कोविड घोटाळ्यात कंत्राटं कोणी ओरबडली? कोविड घोटाळ्यात खैरातीसारखी कंत्राटं कुणाला वाटली ? पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं ?
अलिबागचे 19 बंगले कुणाचे होते ? हे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत उद्धव जी … यावर कधी बोलाल?”, असही त्यांनी (Chitra Wagh) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | सत्तेच्या साठमारीत राज्याला विसरू नका; उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोलाचा सल्ला
- Chandrashekhar Bawankule | “मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत…”; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Raj Thackeray | भाजपसोबत युती करणार का? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
- Uddhav Thackeray | शिवसैनिकानं उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त लिहिलं रक्तानं पत्र
- Sanjay Raut | दुसऱ्यांचे डबे लावूनच हे सरकार चालणार आहे का? संजय राऊतांची सरकारवर खोचक टीका