Nana Patole | नाशिक: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीनं पवारांना धारेवर धरलं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून महाविकास आघाडीतील नेते त्यांच्यावर टीका करताना दिसत आहे.
अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये काँग्रेसने महिलांचे होणारे मृत्यू, आदिवासींचे प्रश्न इत्यादी गोष्टी मांडल्या आहे.
सरकारनं आमच्या पुरवण्या मान्य केल्या आहे. मात्र, यासाठी सरकार एवढा पैसा कुठून आणणार? कारण सरकार ज्यांच्याकडून पैसे घेते त्यामध्ये आदिवासींचाही समावेश आहे. मात्र, सरकार आदिवासी लोकांना सुख सुविधा पुरवते का?
I don’t call Ajit Pawar a lizard – Nana Patole
पुढे बोलताना ते (Nana Patole) म्हणाले, “भारतीय जनता पक्ष फक्त मूठभर लोकांना सुख सुविधा देते. त्यामुळं त्यांचा हा माज जनताच उतरवणार आहे.
सरडा रंग बदलतो. त्याचप्रमाणे अजित पवारांनाही रंग बदलला आहे. मी अजित पवारांना सरडा म्हणत नाही. मात्र, सध्या त्यांच्यात माणुसकीचा धर्म दिसत नाही.”
यावेळी बोलत असताना नाना पटोलेयांनी भाजप सरकारवर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, “भाजप वाल्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केली होती.
आता त्या गोष्टीचं काय झालं आहे? टोल नाक्यांपासून कधी सुटका मिळेल? हे सरकार फक्त घोषणांचा पाऊस पडणार आहे. ही टोल पार्टी आहे”, असही ते (Nana Patole) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांच्या चिंतेत वाढ होणार! सोमय्यांचा व्हायरल व्हिडिओ खरा?
- Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भाषा शोभत नाही – दीपक केसरकर
- Raj Thackeray | “आजही शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र…”; राज ठाकरेंचं मोठं विधान
- Chitra Wagh | “सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत…”; चित्रा वाघांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले
- Uddhav Thackeray | सत्तेच्या साठमारीत राज्याला विसरू नका; उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोलाचा सल्ला