Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये मुलाखत घेतली आहे.
दोन भागांमध्ये ही मुलाखत प्रसारित केली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज सकाळी 08 वाजता प्रदर्शित झाला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवल्याचं दिसून आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे.
ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं.
अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे.
कारण 2019 च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे नरेंद्र मोदीजींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील.”
You should not worry about the seat allocation of Mahayuti – Chandrashekhar Bawankule
पुढे ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का ? त्याकडे लक्ष द्या. आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे.
तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी 5 दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत.
त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण 2024 साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसण्याचं काम देणार आहे.”
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 27, 2023
“30 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं. ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत.
मुंबईवरील तुमचं बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल”, असही ते (Chandrashekhar Bawankule) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sudhir Mungantiwar | राज ठाकरेंनी आयुष्यभर आमच्या सोबत येऊ नये, हीच सदिच्छा – सुधीर मुनगंटीवार
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांच्या चिंतेत वाढ होणार! सोमय्यांचा व्हायरल व्हिडिओ खरा?
- Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भाषा शोभत नाही – दीपक केसरकर
- Raj Thackeray | “आजही शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र…”; राज ठाकरेंचं मोठं विधान
- Uddhav Thackeray | शिवसैनिकानं उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त लिहिलं रक्तानं पत्र