Sudhir Mungantiwar | मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.
आज राज ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आम्ही भाजपसोबत जाणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी आयुष्यभर आमच्यासोबत येऊ नये, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
We are happy that Raj Thackeray will not come with BJP – Sudhir Mungantiwar
राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “राज ठाकरे जर भाजपसोबत येणार नसतील तर ते ठीक आहे. तो पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे.
मात्र, आम्ही देखील त्यांच्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत का? ते भाजपसोबत येणार नाही याचा आम्हाला आनंद आहे. त्याचबरोबर त्यांनी आयुष्यभर आमच्या सोबत येऊ नये, हीच सदिच्छा!”
दरम्यान, पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत संवाद साधत असताना राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “मी भाजपसोबत कधीच जाणार नाही.
कुणी कुणाची भेट घेतली की युती होत नसते. मी एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होतो. त्या ठिकाणी शरद पवार देखील आले होते. म्हणजे आमची लगेच युती झाली का?”
पुढे बोलताना ते म्हणाले, “अमित ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहे. ते टोलनाके फोडत महाराष्ट्र फिरत आहे, असं काही नाही.
त्यांच्या गाडीला फास्टटॅग असतानाही त्यांना टोल नाक्यावर थांबवण्यात आलं. समोरचा माणूस त्यांच्याशी उद्धटपणे बोलला. त्यामुळे त्यांच्याकडून ती प्रतिक्रिया आली आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole | अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला – नाना पटोले
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांच्या चिंतेत वाढ होणार! सोमय्यांचा व्हायरल व्हिडिओ खरा?
- Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भाषा शोभत नाही – दीपक केसरकर
- Raj Thackeray | “आजही शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र…”; राज ठाकरेंचं मोठं विधान
- Chitra Wagh | “सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत…”; चित्रा वाघांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले