Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टसाठी मुलाखत घेतली आहे.
त्यांच्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.
याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे.
Does the importance of cricket really end in Mumbai? – Ashish Shelar
ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “◆मुंबईला काय घातक आहे?
◆मुंबई महापालिका निवडणुका कोण कोर्टात गेल्यामुळे रखडल्यात?
◆मुंबईला कुणी किती वर्षे लुटली?
◆मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं?
◆क्रिकेटचं महत्त्व मुंबईतून खरंच संपतंय का?
◆सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का?
पुढे ते (Ashish Shelar) म्हणाले, “मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागणार! घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षा, चला तर मग…सोडा अहंकार… व्हा दिलदार…टोमणे मारणे सोडा.. चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा आता होऊन जाऊ दे चर्चा!!”
◆मुंबईला काय घातक आहे?
◆मुंबई महापालिका निवडणुका कोण कोर्टात गेल्यामुळे रखडल्यात?
◆मुंबईला कुणी किती वर्षे लुटली?
◆मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं?
◆क्रिकेटचं महत्त्व मुंबईतून खरंच संपतंय का?
◆सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का ?मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 27, 2023
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीनंतर विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं दिसून आलं आहे. त्यांच्या या मुलाखतीवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे.
अशात आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे काय उत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | आम्ही परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोय; INDIA आघाडीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना बहुधा अल्झायमरचा आजार झालयं – चंद्रशेखर बावनकुळे
- Sudhir Mungantiwar | राज ठाकरेंनी आयुष्यभर आमच्या सोबत येऊ नये, हीच सदिच्छा – सुधीर मुनगंटीवार
- Nana Patole | अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला – नाना पटोले
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांच्या चिंतेत वाढ होणार! सोमय्यांचा व्हायरल व्हिडिओ खरा?