Ambadas Danve | “तुमचे 105 आमदार कधी पळून जातील…”; अंबादास दानवेंचा आशिष शेलारांवर पलटवार

Ambadas Danve | मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेल्या मुलाखतीवरून भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे यांना मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले आहे.

आशिष शेलार यांच्या या प्रश्नाचे उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. प्रश्नांची उत्तरे द्यायला किंवा चर्चा करायला उद्धव ठाकरे कशाला पाहिजे? त्यासाठी आम्हीच काफी आहोत असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “मंत्रालयात आल्यावरच कामं होतात असं जर झालं असतं तर खूप परिवर्तन झालं असतं.

कोविड काळात नरेंद्र मोदी कुठे गेले होते? हे एकदा त्यांना विचारा. केंद्रात बसलेल्या एकाही मंत्र्याला कवडीचं काम नसतं. त्याचबरोबर भाजपचे खासदार आणि मंत्री कधीच मतदारसंघात नसतात. 24 दिवसांचे दौरे त्यांच्या हातात दिले जातात.”

Your 105 MLAs are just staring – Ambadas Danve

पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “तुमच्यातले किती आमदार शिल्लक राहिले आहे? आधी ते बघा. तुमचे 105 आमदार फक्त तोंड बघत बसत आहे.

ते कधी मागच्या दरवाजानं निघून जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आशिष शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायला उद्धव ठाकरे कशाला हवे? त्याच्यासाठी आम्हीच काफी आहोत.”

“बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना यांनी त्यांना खूप त्रास दिला. बाळासाहेब ठाकरेंमुळे हे लोकं निवडून आले होते. मात्र, या लोकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला गद्दारी करायला भाग पाडलं.

त्यामुळे त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील नाही. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय ही लोकं निवडून येऊ शकत नाही”, असही ते (Ambadas Danve) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.