Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मुंबईसह काही भागात अतिवृष्टी होताना दिसत आहे. मात्र, राज्यातील अर्ध्या भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही.
अशात पावसाचं कारण काढून राज्य सरकार पावसाळी अधिवेशन (Monsoon session) गुंडाळण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “पावसाचं कारण काढून राज्य सरकार अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आम्ही ऐकल्या आहे.
परंतु पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम 04 ऑगस्टपर्यंत ठरलेला आहे. आताशी या अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. आणखीन एक आठवडा बाकी असताना अधिवेशन संपवणे योग्य नाही.”
The government should hold the session for full time
पुढे बोलताना ते (Nana Patole) म्हणाले, “राज्यामध्ये सध्या अनेक समस्या आहेत. शेतकरी, तरुण वर्ग, महिला, बेरोजगारी, महागाई, कष्टकरी, अतिवृष्टी इत्यादी प्रश्नांवर चर्चा झालीच पाहिजे.
कारण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना अधिवेशन हेच एक महत्त्वाचं व्यासपीठ मिळतं. त्यामुळं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं अधिवेशन पूर्ण वेळ घेतलं पाहिजे.”
दरम्यान, एकीकडे अधिवेशनावरून (Nana Patole) राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे. तर दुसरीकडे अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.
“अजित पवार आज ना उद्या राज्याचे मुख्यमंत्री होतील. ते गेल्या अनेक वर्षापासून आमच्या पक्षाचं नेतृत्व करत आहे. त्यामुळं काम करणाऱ्यांना आज ना उद्या संधी मिळतेच”, असं वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Praful Patel | अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील – प्रफुल पटेल
- Sanjay Raut | बावनकुळेंची लायकी आहे का उद्धव ठाकरेंवर टीका करायची? – संजय राऊत
- Uddhav Thackeray | राज्य सरकारनं आजचा दिवस ‘धोकेबाज दिन’ म्हणून घोषित करावा; उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेत्याची मागणी
- Nitesh Rane | जागतिक ‘गद्दार’ दिवसाच्या शुभेच्छा; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
- Uddhav Thackeray | आम्ही परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोय; INDIA आघाडीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया