Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांसह भाजप नेत्यांनी ही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते मोहीम कंबोज (Mohit Kamboj) यांचं एक ट्विट चर्चेत आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना टोले मारत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मोहित कंबोज म्हणाले, “फसवणूक आणि संधीसाधूपणाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांचं सुवर्ण अक्षरांनी नाव लिहिलेलं आहे, अशा उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! महाराष्ट्र सरकारने आजचा दिवस ‘धोकेबाज दिन’ म्हणून जाहीर करायला हवा.”
महाराष्ट्र की राजनीति के इतिहास में धोखेबाज़ी और मौकापरस्ती में जिनका नाम सोने के अक्षर में लिखा गया है ऐसे जनाब उद्धव जी को हैप्पी टू यू !
आज का दिन #DhokebaazDay महाराष्ट्र सरकार को घोषित करना चाहिए ! #HappyBirthdayDhokebaaz
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) July 27, 2023
मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त आणखीन एक ट्विट केलं आहे. ‘राष्ट्रीय टोमणे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’ असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रीय "टोमणे" दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …..@OfficeofUT
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) July 27, 2023
मोहित कंबोज यांच्यासह भाजप नेते नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त सुनावलं आहे.
Happy National Traitor Day – Nitesh Rane
‘राष्ट्रीय गद्दार दिनाच्या शुभेच्छा’, असं म्हणत नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
तर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरेंना अल्झायमरचा आजार झाला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजप नेत्यांनी दिलेल्या या शुभेच्छांवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | जागतिक ‘गद्दार’ दिवसाच्या शुभेच्छा; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
- Sanjay Raut | बावनकुळेंची लायकी आहे का उद्धव ठाकरेंवर टीका करायची? – संजय राऊत
- Ambadas Danve | “तुमचे 105 आमदार कधी पळून जातील…”; अंबादास दानवेंचा आशिष शेलारांवर पलटवार
- Uddhav Thackeray | “… म्हणून शिंदे गटाची माझ्याकडे यायची हिम्मत झाली नाही”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Ashish Shelar | “घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षा…”; आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका