Share

सचिन अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब; उपसभापती निवडणुकीत शिंदेंची खेळी

शिवसेना शिंदे गटाने विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांना उमेदवारी देत उद्धव ठाकरेंना आणखी एक राजकीय धक्का दिला.

Published On: 

Sachin Aher

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Legislative Council Deputy Chairman Post)

विधान परिषद उपसभापती पद महायुतीच्या वाटपात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आले होते. या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. मात्र, अखेर शिंदे गटाने सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी शिंदे गटातील काही नेत्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यानंतर सचिन अहिर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटानेही या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवला आहे. ठाकरे गटाकडून जगन्नाथ अभ्यंकर (Jagannath Abhyankar) यांना उपसभापती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

संख्याबळाचा विचार करता शिवसेना शिंदे गटाकडे महायुतीच्या पाठिंब्यामुळे अधिक ताकद आहे. त्यामुळे सचिन अहिर यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, ठाकरे गटानेही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत राजकीय लढत कायम ठेवली आहे.

याआधी शिवसेना ठाकरे गटाला मोठे राजकीय धक्के बसले आहेत. शिंदे गटाकडून राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ठाकरे गटातील सहा खासदारांनी साथ सोडल्याचा दावा करण्यात आला होता.

खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटात आमदारांच्या संभाव्य हालचालींचीही चर्चा सुरू झाली आहे. काही आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांसोबत बैठका घेतल्या आणि फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरे केले. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही