Share

Praful Patel | अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील – प्रफुल पटेल

Praful Patel | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. याच चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

Published On: 

Praful Patel | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.

अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. याच चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar is a popular leader of Maharashtra – Praful Patel

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले, “आज ना उद्या अजित पवार मुख्यमंत्री होतील. अजित पवार महाराष्ट्राचे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत.

ते गेल्या अनेक वर्षापासून आमच्या पक्षाचं नेतृत्व करत आहे. त्यामुळं काम करणाऱ्यांना आज ना उद्या संधी मिळतेच.”

काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार (Praful Patel) असल्याचं म्हटलं होतं.

ते म्हणाले, “10 ऑगस्ट पर्यंत अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दुसरी सन्मान जनक जबाबदारी देऊन अजित पवारांना मुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला दिसतोय.”

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरू आहे. अशात प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या चर्चा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि शिंदे गटात यावरून वाद झाला असल्याची माहिती देखील मिळाली होती.

अशात प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येईल? हे पाहण्यासारखं असेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही