Rohit Pawar | मुंबई: अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
या चर्चांवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. तर या प्रकरणामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. या प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
I will be happy if Ajit Pawar becomes the Chief Minister of Maharashtra – Rohit Pawar
माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “मी अजित पवारांचा पुतण्या आहे. त्यामुळे अजित पवार जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल.
मात्र, सामान्य नागरिक म्हणून मला ही गोष्ट अजिबात पटणार नाही. आता अजित पवार जर महाविकास आघाडीमध्ये असते तर ते पुढचे पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते.”
यावेळी बोलत असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप सरकारवर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये भांडण लावून दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न तर नाही ना?
राम शिंदे काहीही अभ्यास न करता आमच्याबद्दल बोलत असतात. त्यांना आमच्यावर आरोप करणं सोपं वाटतं. पाच वर्ष ते स्वतः कॅबिनेट मंत्री होते. मात्र, तेव्हा त्यांना एमआयडीसी मंजूर करून घेणं जमलं नाही.”
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एसटी महामंडळाच्या एका बसचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बसचं छप्पर उडताना दिसत आहे.
यावरून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारला चांगलं सुनावलं आहे. ते म्हणाले, “जेंव्हा राजकारण मूलभूत मुद्द्यांना वरचढ होतं, संस्थामध्येही राजकारणाचा शिरकाव होतो, तेंव्हा विकास मात्र हरवतो.
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ST महामंडळाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय गतिमान आणि महाराष्ट्र वेगवान’ अशी केवळ जाहीरातबाजी करण्यापुरताच या सरकारकडून ST चा वापर केला जात असल्याने मूलभूत प्रश्नांकडं मात्र दुर्लक्ष होत असल्याचंच या फोटोवरुन दिसत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | “… तर तेव्हा विकास मात्र हरवतो…”; रोहित पवारांचं राज्य सरकारवर टीकास्त्र
- Nana Patole | “पावसाचं कारण काढून राज्य सरकार…”; नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल
- Praful Patel | अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील – प्रफुल पटेल
- Uddhav Thackeray | राज्य सरकारनं आजचा दिवस ‘धोकेबाज दिन’ म्हणून घोषित करावा; उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेत्याची मागणी
- Nitesh Rane | जागतिक ‘गद्दार’ दिवसाच्या शुभेच्छा; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात