Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एका बसचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
बसचं छप्पर उडत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे. या प्रकरणानंतर अनेकांनी एसटी महामंडळ आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी देखील राज्य सरकारला चांगलं सुनावलं आहे.
ST bus was used by this government only for publicity purposes – Rohit Pawar
ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “जेंव्हा राजकारण मूलभूत मुद्द्यांना वरचढ होतं, संस्थामध्येही राजकारणाचा शिरकाव होतो, तेंव्हा विकास मात्र हरवतो.
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ST महामंडळाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय गतिमान आणि महाराष्ट्र वेगवान’ अशी केवळ जाहीरातबाजी करण्यापुरताच या सरकारकडून ST चा वापर केला जात असल्याने मूलभूत प्रश्नांकडं मात्र दुर्लक्ष होत असल्याचंच या फोटोवरुन दिसत आहे.”
जेंव्हा राजकारण मूलभूत मुद्द्यांना वरचढ होतं, संस्थामध्येही राजकारणाचा शिरकाव होतो, तेंव्हा विकास मात्र हरवतो. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ST महामंडळाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय गतिमान आणि महाराष्ट्र वेगवान’ अशी केवळ… pic.twitter.com/JcBlp57Fvi
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2023
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. आजपर्यंत पावसाळ्यामध्ये बसचं छत गळणे, बस रस्त्यात बंद पडणे इत्यादी घटना घडताना आपण पाहिलेल्या आहे.
मात्र, आज घडलेली घटना काही वेगळीच होती. गडचिरोली ते अहेरी या मार्गावर धावत असताना या बसचं छप्पर उडालं (Rohit Pawar) आहे.
अर्धवट छप्पर तुटलेल्या अवस्थेत ही बस काही किलोमीटर धावत (Rohit Pawar) होती. सुदैवानं बसचं अर्धच छप्पर तुटल्यामुळं मोठी दुर्घटना टळली.
सोशल मीडियावर या बसचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | “… नाहीतर जनमाणसाचा उद्रेक होऊ शकतो”; जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Nana Patole | “पावसाचं कारण काढून राज्य सरकार…”; नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल
- Praful Patel | अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील – प्रफुल पटेल
- Uddhav Thackeray | राज्य सरकारनं आजचा दिवस ‘धोकेबाज दिन’ म्हणून घोषित करावा; उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेत्याची मागणी
- Nitesh Rane | जागतिक ‘गद्दार’ दिवसाच्या शुभेच्छा; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात