Share

Yashomati Thakur | चोराच्या उलट्या बोंबा मारू नका, राजधर्माचं पालन करा; यशोमती ठाकूर यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

🕒 1 min readYashomati Thakur | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार घडत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होताना दिसत आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) माणिपूरच्या हिंसाचारावर लक्ष देत नसल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.Related News for Youगॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! आता … Read more

Published On: 

🕒 1 min read

Yashomati Thakur | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार घडत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होताना दिसत आहे.

या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) माणिपूरच्या हिंसाचारावर लक्ष देत नसल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सावित्रीबाई फुले प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे.

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या, “चोराच्या उलट्या बोंबा मारू नका, राजधर्माचं पालन करा. महिला अत्याचाराच्या घटनांवर पक्षीय राजकारण करणाऱ्या स्मृती इराणी यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.

मणिपूरच्या घटनेबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्या मौनाबाबत प्रश्न विचारले. मणिपूर वर बोलणं टाळण्यासाठी आता भाजपने अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मणिपूर साठी जबाबदार धरण्याचा कांगावा सुरू केला आहे.

काल महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी एखाद्या टीव्ही डिबेट किंवा पक्षाच्या सभेत असल्या सारख्या बोलल्या. त्यांचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा होता.”

This government does not have the sensitivity to talk about the Manipur incident – Yashomati Thakur

पुढे त्या (Yashomati Thakur) म्हणाल्या, “मणिपूरच्या घटनेवर बोलायची संवेदनशीलता ही या सरकारमध्ये नाही. केंद्र सरकार संसदेत चर्चा करायला तयार नाही.

या विषयावर राजकारण करायचं नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती, ईशान्येकडच्या राज्यांकडे विशेष लक्ष द्या असं राहुल गांधी नी सांगितलं होतं. मात्र सरकार आता राहुल गांधी यांना या बाबत दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतयं.

या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, आणि आम्ही या वृत्तीचा निषेध करतो. पंतप्रधान मोदींनी राजधर्म पाळला पाहिजे. संघ परिवाराशी संबंधित इंडिक टेल ही प्रपोगंडा साइट आहे.

या साइटची मालकी सरयू या एनजीओ कडे आहे. ही एनजीओ ही समाजात विष कालणारा मोडका इतिहास पसरवत असते. सावित्रीबाईं वरच्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर या वेबसाइट वर माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

मात्र हा माफीनामा मान्य नाही. या एनजीओ ला आर्थिक रसद पुरवणारे कोण आहेत त्यांची नावे समोर आली पाहिजेत. खोटा इतिहास पेरणाऱ्या या साईटच्या ब्रेन ला अटक झाली पाहिजे.

संघपरिवाराशी संबंधित असल्याने कारवाईचं थातूरमातूर नाटक दाखवण्याचा प्रयत्न करून वेळ मारून नेली जात आहे.”

“संघ परिवाराशी संबंधित अनेक संस्था आता सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारं साहित्य पुस्तिका रूपाने काढून व्हायरल करत आहेत.

काही सोशल मिडीया हँडल्स त्यांना इंग्रजांचे हस्तक म्हणून प्रचार करत आहेत. फुले दाम्पत्याचं सामाजिक कार्य आभाळाएवढं आहे, त्यांनी वंचित घटक आणि सर्व जाती-धर्मातील महिलांना सन्मान दिला. आज आम्ही केवळ या दाम्पत्यामुळे इथे आहोत. अशावेळी त्यांचे योगदान नाकारणारी जी काही टोळी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे,

त्याचा मुखिया संघपरिवारच कसा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या लोकांवर तुम्ही कारवाई कराच, पण यामागचे ब्रेन ही समोर आले पाहिजेत”, असही त्यांनी (Yashomati Thakur) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!