Opposition Meeting | मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी पाटणा आणि बंगळूर शहरामध्ये विरोधकांची बैठक पार पडली आहे.
सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) म्हणजेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स (Indian National Development Inclusive Alliance) नावाची आघाडी स्थापन केली आहे.
विरोधकांच्या या आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार आहे. त्यांच्या या बैठकीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असताना या बैठकीची तारीख समोर आली आहे.
The meeting of the opposition in Mumbai will be held on August 25 and 26
विरोधकांची मुंबईतील बैठक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीमध्ये विरोधकांच्या आघाडीचा चेहरा आणि आघाडीची समन्वय समिती निश्चित होण्याचा अंदाज बांधला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज दिल्लीहून मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईत आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे.
शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल? याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांच्या या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते पदाची देखील चर्चा होऊ शकते. शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या या बैठकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम सारखे तब्बल 26 राजकीय पक्ष सामील झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | भविष्यात निश्चितच अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे – संजय शिरसाट</a
- Sanjay Shirsat | भविष्यात निश्चितच अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे – संजय शिरसाट
- Yashomati Thakur | चोराच्या उलट्या बोंबा मारू नका, राजधर्माचं पालन करा; यशोमती ठाकूर यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- Rohit Pawar | “अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर…”; रोहित पवारांचं खळबळजनक वक्तव्य
- Rohit Pawar | “… तर तेव्हा विकास मात्र हरवतो…”; रोहित पवारांचं राज्य सरकारवर टीकास्त्र