Monsoon Session | मोदींच्या पुणे दौऱ्यामुळे अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Monsoon Session | मुंबई: राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागांमध्ये यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळं राज्यातील बहुतांश ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या दिल्या जात आहे. अशात सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला देखील दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.

All MLAs have also been instructed to go to their respective constituencies

काल (27 जुलै) झालेल्या कामकाजानंतर सल्लागार समितीची बैठक झाली. सोमवारी आणि मंगळवारी (31 जुलै आणि 01 ऑगस्ट) विधिमंडळाचे सत्र न घेण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

यानंतर सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या (Monsoon Session) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर येत असल्यामुळे अधिवेशनाला सुट्टी दिली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, विधिमंडळाचं पूर्णवेळ कामकाज व्हावं, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडलं आहे. तर बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी देखील अधिवेशन (Monsoon Session) गुंडाळण्यास विरोध दर्शवला होता.

मात्र, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस विधिमंडळाचं (Monsoon Session) कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय देखील यांनी घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.