Share

Vijay Wadettiwar | खोटं बोलायला एवढा कॉन्फिडन्स लागतो; विजय वडेट्टीवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी दोन्ही पक्ष बैठका घेत आहे.

अशात लवकरच विरोधकांची मुंबईतील बैठक होणार आहे. 25 आणि 26 ऑगस्ट रोजी विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

विरोधकांच्या या बैठकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) खोचक टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ट्विट मोदींवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

या व्हिडिओत मोदी म्हणतात, “भारतामध्ये दरवर्षी एक नवीन आयआयटी (IIT) आणि आयआयएम (IIM) इन्स्टिट्यूट स्थापन होत आहे. ” मोदींच्या या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Not a single new IIM, IIT has been established in the country in 5 years – Vijay Wadettiwar

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “खोटं बोलायला पण असा कॉन्फिडन्स लागतो! खरंतर ५ वर्षात एक ही नवीन IIM, IIT देशात स्थापन झाले नाही.

भारताचे नागरिक म्हणून इतकं खोटं ऐकून सुद्धा आपण गप्प कसे बसणार? गेल्या 5 वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आयआयएम आणि आयआयटी सारख्या कोणत्याही नवीन शैक्षणिक संस्थांची स्थापना केलेली नाही.

शिक्षण हा देशाच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा पाया आहे . परंतु आज देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचे पाहणे हे निराशाजनक आहे.”

दरम्यान, लवकरच मुंबईमध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार (Vijay Wadettiwar) आहे. तत्पूर्वी आज शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आज शरद पवारांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल? याबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी दोन्ही पक्ष …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now