Sambhaji Bhide | “मानसिकदृष्ट्या ठीक नसलेल्या व्यक्तीचा वेळेत बंदोबस्त केला नाही तर…”; काँग्रेसची संभाजी भिडेंवर खोचक टीका

Sambhaji Bhide | टीम महाराष्ट्र देशा: महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं.

मात्र, त्यांचं हे खरं नाव नसल्याचा दावा भिडेंनी केला आहे. करमचंद गांधी हे गांधीजींचे खरे वडील नसून त्यांचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने (Congress) संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Bhide’s statements show that he is not mentally well – Congress

“उतारवयात माणसाला बरेच आजार लागतात आणि त्यात मानसिक आजारही असतात. भिडेंची विधानं पाहिली की ते मानसिकदृष्ट्या ठीक नसल्याचीच लक्षणं दिसतात.

अशा मानसिकदृष्ट्या ठीक नसलेल्या व्यक्तीचा वेळेत बंदोबस्त केला नाही तर अशी माणसाला शांतता भंग करुन समाज अस्थिर करण्याला कारणीभूत ठरतात त्यामुळे सरकारने भिंडेंचा बंदोबस्त केलाच पाहिजे”, अशी टीका काँग्रेसने संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर केली आहे.

दरम्यान, संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “महात्मा गांधी हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र आहे.

करमचंद गांधी त्यावेळी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्यावेळी करमचंद गांधींनी जमीनदाराची मोठी रक्कम चोरली होती. त्यानंतर ते पळून गेले होते.

त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला घरी आणले होते. त्यामुळ करमचंद गांधी नाही, तर ते जमीनदार गांधीजींचे खरे वडील आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.