Share

Sanjay Gaikwad | “शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र आले…”; संजय गायकवाडांचं खळबळजनक विधान

Sanjay Gaikwad | मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालत होताना दिसत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले.

त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. या सर्व राजकीय घडामोडींवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Anything can happen in politics these days – Sanjay Gaikwad

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय गायकवाड म्हणाले, “सध्या राजकारणामध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी घडताना दिसल्या आहे. जे पक्ष कधी एकत्र येणार नव्हते ते अलीकडच्या काळात एकत्र आले आहे.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहे. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहे. त्यामुळे उद्या जर शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एकत्र आले तर त्यात काहीच नवल वाटणार नाही.

राजकारणात सध्या काहीही होऊ शकतं, हे तितकंच खरं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघून राजकारणाबाबत भविष्यवाणी करणे योग्य नाही.”

यावेळी बोलत असताना संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षांवर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, “विरोधक अजून विरोधी पक्ष नेता ठरवू शकले नाही आणि हे विरोधकांचं खूप मोठं अपयश आहे.

आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र विरोधकांना अजूनही त्यांचा गटनेता निवडता आलेला नाही.

कारण त्यांचा त्यांच्यातच ताळमेळ बसत नाही. कितीही बैठका झाल्या तरी विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांचं कधीच एकमत होणार नाही, असं दिसत आहे.”

महत्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad | मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालत होताना दिसत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now