Rohit Pawar | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची आणि कोणती? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकला आहे. या प्रकरणावरून निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गटाला नोटीस बजावली आहे. त्यानंतर या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “निवडणूक आयोग गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या लोकांची बाजू घेत आहे, असं मत सामान्य लोकांनी व्यक्त केलं आहे.
निवडणूक आयोगाने आम्हाला नोटीस बजावली आहे. ती एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया पूर्ण करत असताना दोन्ही बाजूचे गट आपापली ताकद लावतील. यावरून निवडणूक आयोग काय निर्णय देईल? याचा अंदाज सर्वांनाच लागला आहे.
We will fight in court for NCP – Rohit Pawar
पुढे बोलताना ते (Rohit Pawar) म्हणाले, “राष्ट्रवादीसाठी आम्ही न्यायालयात लढू. परंतु येत्या काळात आमच्याकडं चिन्ह राहिलं नाही, तर शरद पवारांना कोणतं चिन्ह मिळायला हवं? हे आम्ही लोकांनाच विचारू आणि त्या चिन्हावर निवडणुकांना तोंड देऊ.
लोकांना विश्वासात घेऊनच आम्हाला आगामी निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे, असा साधारण अंदाज आला आहे.”
“शेवटी चिन्हापेक्षा विचार महत्त्वाचे आहे. आम्ही शरद पवारांसोबत राहून लढलोय हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे”, असंही ते (Rohit Pawar) यावेळी म्हणाले आहे.
रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटालाच मिळणार अशा चर्चा रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर सुरू झाल्या आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | शिंदे गटातील आमदाराची झाली तब्बल साडेसात कोटींची फसवणूक, नक्की काय आहे प्रकरण?
- Sambhaji Bhide | करमचंद गांधी पैसे घेऊन पळाले अन् जमीनदाराने त्यांची बायको पळवून नेली, महात्मा गांधीचे वडील मुस्लिम – संभाजी भिडे
- Vijay Wadettiwar | खोटं बोलायला एवढा कॉन्फिडन्स लागतो; विजय वडेट्टीवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
- Opposition Meeting | ‘या’ दिवशी होणार INDIA ची मुंबईतील बैठक
- Sanjay Shirsat | भविष्यात निश्चितच अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे – संजय शिरसाट