Share

Dhananjay Munde | शरद पवारांची साथ का सोडली? धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

Dhananjay Munde | मुंबई: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालक झाली होती. या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासह आलेल्या 09 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. … Read more

Published On: 

Dhananjay Munde | मुंबई: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालक झाली होती. या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासह आलेल्या 09 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

Sharad Pawar is our god and support – Dhananjay Munde

‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) शरद पवारांचा (Sharad Pawar) आधार सोडण्याची वेळ का आली? सीबीआय आणि ईडीच्या नोटिसांमुळे तुम्ही त्यांना सोडलं का? हे प्रश्न विचारण्यात आले होते.

या प्रश्नाचे उत्तर देत धनंजय मुंडे म्हणाले, “शरद पवार हे आमचे दैवत आणि आधार आहे. भाजपसोबत जाणं आणि त्यांना पाठिंबा देणं, ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका घेतली आहे. अजित पवार यांनी 05 जुलै रोजी झालेल्या मेळाव्यामध्ये याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे.”

सीबीआय आणि ईडीच्या नोटिसांमुळे तुम्ही त्यांना सोडलं का? यावर उत्तर देत मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “ईडी आणि सीबीआयच्या नोटीस आम्हाला आज नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून येत आहे.

परंतु, या नोटिसांच्या भीतीनं आम्ही भाजपसोबत गेलो नाही. आम्ही या कारवायांमुळं भाजपसोबत गेलो आहोत, हे फक्त लोकांमध्ये पसरवलं जात आहे.

राष्ट्रवादीच्या उभारणीत स्वाभिमान हा मुख्य विषय होता. आमचा पक्ष लोकशाही मानणारा आहे. आमच्यासाठी शरद पवार कायमच आधारस्तंभ आणि दैवत आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट (Dhananjay Munde) पडल्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. अशात शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

ते म्हणाले, “आपल्याला भाजपविरुद्ध लढायचं आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. मुंबईमध्ये होणाऱ्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीचं नियोजन चांगलं करा.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही