Sharad Pawar | एकमेकांची साथ सोडू नका, आपल्याला भाजपविरुद्ध लढायचं – शरद पवार

Sharad Pawar | मुंबई: जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. 02 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडत राष्ट्रवादीचे दोन गट पडले. यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. अशात शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. आपण भाजपच्या विरोधात लढा देणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काल (28 जुलै) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

शरद पवार म्हणाले, “आपल्याला भाजप विरोधात लढा द्यायचा आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. विरोधकांची आघाडी इंडियाच्या बैठकीचं नियोजन चांगलं करा.”

दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया म्हणजेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इक्लुसिव्ह अलायन्स (Indian National Development Inclusive Alliance) नावाची आघाडी स्थापन केली आहे.

विरोधकांच्या या आघाडीची पुढची बैठक मुंबईमध्ये होणार आहे. ही बैठक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

त्याचबरोबर विरोधकांच्या (Sharad Pawar) या बैठकीमध्ये त्यांचा चेहरा आणि आघाडीची समन्वय समिती निश्चित होण्याचा अंदाज बांधला जात आहे.

Rahul Gandhi will visit Maharashtra in August

विरोधी पक्षांच्या बैठकीसह लवकरच महाविकास आघाडीची देखील बैठक होणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसचे राहुल गांधी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

तेव्हा शरद पवार (Sharad Pawar), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महाराष्ट्रात एकत्रित सभा होणार असल्याच्या चर्चा आहे.

काल झालेल्या बैठकीमध्ये या विषयावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. 16 ऑगस्टनंतर राहुल गांधी महाविकास आघाडीच्या सभांसाठी महाराष्ट्रात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.