Sunil Tatkare | “पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले हे बहुतेक ज्योतिषी…”; काँग्रेस नेत्यांवर सुनील तटकरेंची टीका

Sunil Tatkare | चिपळूण: गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. राज्य सरकारमध्ये सामील होताच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

त्यानंतर ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. अशात अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, “अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले (Nana Patole) आणि इतर काँग्रेसचे नेते बोलत आहे, हे वक्तव्य करणारे लोक ज्योतिषी आहेत की नाही मला माहित नाही.

मात्र, अशा प्रकारचे वक्तव्य करणारे महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी महायुतीत फूट पडणार नाही. कारण महायुती भक्कम विचारांवर स्थापन झाली आहे.

We want to speed up development work in the state – Sunil Tatkare

पुढे बोलताना ते (Sunil Tatkare) म्हणाले, “अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आम्ही वास्तववादी आहोत.

आम्हाला आज महायुतीच्या माध्यमातून एनडीएन आघाडी मजबूत करायची आहे. आम्हाला राज्यातील विकास कामांना गती द्यायची आहे. त्याचबरोबर आम्हाला राज्याला प्रगतीपथावर न्यायचं आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री पद हा विषय सध्या आमच्या डोक्यात नाही. हा विषय आजही आमच्या डोक्यात नाही आणि उद्या असण्याचं देखील काही कारण नाही.”

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, “आमच्या राजकीय आकलनानुसार 10 ऑगस्ट किंवा एक दोन दिवसांमध्ये अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात.

कारण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात भाजप योग्य पद्धतीने काम करू शकणार नाही. त्याचबरोबर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप जाण्यास इच्छुक दिसत नाही.

म्हणून शिंदेंना दुसरी सन्मान जनक जबाबदारी देऊन अजित पवारांना मुख्यमंत्री पद द्यावं, असा त्यांचा निर्णय झालेला दिसतोय.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.