Yashomati Thakur | टीम महाराष्ट्र देशा: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.
या प्रकरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भिडे ही व्यक्ती नसून एक विशिष्ट विचारधारा आणि देशाला तोडणारी विकृती असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
Sambhaji Bhide is not a person but a specific ideology – Yashomati Thakur
ट्विट करत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या, “भिडे ही व्यक्ती नसून एक विशिष्ट विचारधारा आणि देशाला तोडणारी विकृती आहे.
आणि त्याच विकृतीचे विकृत सरकार केंद्रात तसेच राज्यात कार्यरत आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई होईल ही शक्यता तर फार नाही. काहीतरी थातूरमातूर गुन्हा नोंदवून भिडे परत बोलायला मोकळा.”
भिडे ही व्यक्ती नसून एक विशिष्ट विचारधारा आणि देशाला तोडणारी विकृती आहे. आणि त्याच विकृतीचे विकृत सरकार केंद्रात तसेच राज्यात कार्यरत आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई होईल ही शक्यता तर फार नाही. काहीतरी थातूरमातूर गुन्हा नोंदवून भिडे परत बोलायला मोकळा, परंतु राष्ट्रपित्याविषयी… pic.twitter.com/dzZo96zKth
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 29, 2023
“परंतु राष्ट्रपित्याविषयी अपशब्द आम्ही सहन करू शकत नाही हा फक्त राष्ट्रपित्याचा अपमान नाही तर या देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शहिदाचा अपमान आहे.
ज्या राष्ट्रपित्याने आपले सर्वस्व या देशासाठी अर्पण केले त्यांच्याबद्दल कोणीही उपरा असे वक्तव्य करत असेल तर पुढे याचे परिणाम गंभीर होईल याची दखल शासनाने आता घ्यावी”, असही त्यांनी या (Yashomati Thakur) ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील प्रतिक्रिया दिली (Yashomati Thakur) आहे. ते म्हणाले, “महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झाली पाहिजे. देशाच्या राष्ट्रपित्याबद्दल एवढं मोठं वक्तव्य केल्यानंतर भिडे बाहेर कसे फिरू शकतात?”
महत्वाच्या बातम्या
- Radhakrishna Vikhe Patil | रोहित पवारांना अजित पवारांचे नेतृत्व मान्य करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही – राधाकृष्ण विखे पाटील
- Sunil Tatkare | “पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले हे बहुतेक ज्योतिषी…”; काँग्रेस नेत्यांवर सुनील तटकरेंची टीका
- Dhananjay Munde | शरद पवारांची साथ का सोडली? धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
- Sharad Pawar | एकमेकांची साथ सोडू नका, आपल्याला भाजपविरुद्ध लढायचं – शरद पवार
- Prithviraj Chavan | समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झाली पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण