🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे.
आज उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरून शिंदे गटाला चांगलं सुनावलं आहे. ठाकरे गटातून जे गेले त्यांना आता जय महाराष्ट्र, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Let those who want to go – Uddhav Thackeray
आज सायन विधानसभा मतदारसंघात बोलत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या, हे मी आधीपासूनच सांगत आलो आहे.
कुणीतरी आपल्याला सोडून गेल्यानंतरच आपल्या सागराला जास्त उधाण येतं, ते उधाण राग, त्वेष आणि जिद्दीचं असतं. त्याचबरोबर कुणी आपल्याला सोडून गेल्यावर आपली जिंकायची इच्छा आणखीन वाढते.
प्रत्येक वेळी टीका करत असताना त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं असतं. एवढं सगळं होऊन देखील शिवसेना आणि उद्धव ठाकरे संपत नाही? असा त्यांना प्रश्न पडला असावा.”
पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “जे आपल्याला सोडून गेले आहे, त्यांना आता जय महाराष्ट्र. जे शिंदे गटात गेले आहे, त्यांचा आणि आपला संबंध तुटला आहे.
ज्या लोकांनी (शिंदे गट) आपल्यासोबत गद्दारी केली आहे, त्यांनी आता तिकडे जाऊन गद्दारी करू नये एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी त्या पक्षाच्या विरोधात जाऊन काम करू नये. त्यांनी जर असं केलं तर एक शिवसैनिक म्हणून आपल्याला त्या गोष्टीकडं बघावं लागेल.”
महत्वाच्या बातम्या
- Deepak Kesarkar | संभाजी भिडेंचा भाजपसोबत संबंध जोडणं आरोग्य – दीपक केसरकर
- Kishor Kadam | “अजित पवारांना हतबल करून…”; संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर किशोर कदमांची प्रतिक्रिया
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ! ‘त्या’ वक्तव्यावरून भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल
- Ashish Shelar | ठाकरे गटानं सरळ-सरळ पाकिस्तानला मदत केली? आशिष शेलारांचा खडा सवाल
- Yashomati Thakur | संभाजी भिडे म्हणजे देशाला तोडणारी विकृती – यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










