Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ! ‘त्या’ वक्तव्यावरून भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल

Sambhaji Bhide | अमरावती: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

त्याचबरोबर संभाजी भिडे यांना अटक करा, अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे. अशात आता अमरावतीमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has been registered against Sambhaji Bhide in Rajapeth Police Station in Amravati

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील दिसून आले आहे.

यानंतर अखेर अमरावती येथील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषण करणे 153 कलम अंतर्गत राजापेठ पोलिसांनी भिडेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अमरावतीमध्ये बोलत असताना संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, “मोहनदास गांधी म्हणजेच महात्मा गांधी हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र आहे.

त्यावेळी करमचंद गांधी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामासाठी जात होते. करमचंद गांधी त्या जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले होते.

त्यानंतर चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळून घरी आणले. त्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नी सारखा व्यवहार केला. म्हणून महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे.”

महत्वाच्या बातम्या