Share

Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ संस्थेत 11 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात डॉ पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात डॉ पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 11 जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो आणि वसतिगृह ताठ आवार व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय, पगार आणि इतर तपशील यांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

डॉ पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, विद्यापीठ रोड तपोवन गेट जवळ, अमरावती.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1gZ6al9w2bj1dPr0mJkUbemz-oNzFx88J/view

अधिकृत वेबसाईट

https://www.prabodhiniamravati.org.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही