Eknath Shinde | “लोकशाहीचा हा विजय”; ‘शिवसेना’, ‘धनुष्यबाण’ हाती आल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde | मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादाचा अंत केला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्याशिवाय पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“लोकशाहीचा हा विजय”

“लोकशाहीचा हा विजय आहे. हा घटनेचा विजय आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे. त्यांचा संकल्प आणि विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असतं. आज सत्याचा विजय आहे. शिवसेनेने जो संघर्ष केला त्याचा हा विजय आहे”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

आयोगाने दिलेला निर्णय मेरीटवर

“बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेल्या निर्णयांशी एकरुप झालेल्या आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिक यांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो. आमचं सरकार नियम आणि कायद्याने स्थापन झालं. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मेरीटवर आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

बाळासाहेबांची शिवसेना आता शिंदेंची

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिले आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या- 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.