Sanjay Raut | “निवडणूक आयोगाने सत्य, न्यायचे धिंडवडे काढले”; आयोगाच्या निकालावर संजय राऊत आक्रमक

Sanjay Raut | मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादाचा अंत केला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्याशिवाय पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे.

संजय राऊतांचे ट्वीट (Sanjay Raut’s Twit)

“निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले. चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक आयोग त्यास मान्यता देते.ही पटकथा आधीच लिहून तयार होती. देश हुकूशाहीकडे निघाला आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल असे गद्दार सांगत होतेच.खोके चमत्कार झाला! लढत राहू”, असे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना आता शिंदेंची 

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिले आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-